फेसबुकवर जुन्या वस्तूंच्या विक्रीची जाहिरात देऊन नागरिकांना फसविण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात उघडकीस येत असून सॅलसबरी पार्क परिसरातील या स्वरुपाच्या प्रकाराबाबत मंगळवारी (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे फेसबुक अकाउंट असून त्याठिकाणी त्यांना फर्निचर विक्रीची जाहिरात दिसली. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला.

त्यावेळी जाहिरातीमध्ये दाखविलेले ६० हजार रुपये किंमतीचे फर्निचर ५५ हजार रुपयांचा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले. त्यांना पैसे ऑनलाइन पाठविण्यासाठी एक खाते क्रमांक दिला.

Advertisement

त्यानंतर सायबर चोरट्याने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपये उकळले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.