पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता नारायणगावजवळ तयार झाला असून, त्याचे फोटो केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी उत्पादने पुण्या-मुंबईला वेगाने पोचणार

देशभरात रस्ते निर्मितीचा चालना मिळत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात आले आहेत.

Advertisement

हे सर्व केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होत आहे. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचतील, असंही ट्वीट गडकरी यांनी केलं.

गडकरींच्या कामाचा वेग भन्नाट

गडकरी यांच्या कामाचा वेग भन्नाट आहे. पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलांमुळे भारतातील रस्तेही युरोप आणि अमेरिकेसारखे होतील, असं गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

दिल्ली-मुंबईमधील अंतर फक्त 12 तासांत कापता येणार आहे. राज्यातील समृद्धी महामार्गाने मुंबई-नागपूरमधील अंतरही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.

Advertisement

कसा आहे नारायणगाव बाह्यवळण मार्ग ?

पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचं काम 2016 ला सुरू झाले.

सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते.

त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक पोहोचणे आता सहजशक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

Advertisement