आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी कमी खर्चात कमी कालावधीत अधिक उत्पन्न घेण्यासाठी भन्नाट असे नानाविध प्रयोग करत असतो. असाच काही एक भन्नाट प्रयोग बिहारच्या शेतकऱ्याने केला आहे.

सध्या बिहारमध्ये चर्चा आहे ती केशरी कोबीची. येथील चपराण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केली आहे. यामध्ये केशरी रंगाची कोबी ही सर्वोत्तम ठरलेली आहे. हा कॅनेडियन वंशाची भाजी आहे.

चपराणा जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग राबवून उत्पादनात वाढ तर करीत आहेतच पण परदेशातील भाज्यांची लागवड करुन आपले वेगळेपण सिध्द करीत आहेत.

Advertisement

येथील अनेक शेतकरी हे आधुनिक पध्दतीने विदेशी पालेभाज्यांची लागवड करुन कितीतरी अधिक पटीने नफा कमावत आहे. त्यापैकीच हा केशरी कोबी असून लागवड आणि जोपासण्यावर 10 हजार खर्च केले तर त्यामधून 80 हजार रुपये हे पदरी पडणार आहेत. अशा पध्दतीने उत्पादन घेण्यास सुरवातही झाली आहे.

केशरी कोबीतून उत्पादकता अधिक शेती व्यवसयामध्ये केवळ पारंपरिक शेतीलाच महत्व नाही तर काळाच्या ओघात बदलही गरजेचे आहेत. बिहारमधील समूता गावात राहणारे आनंद हे पहिल्यापासूनच आधुनिक शेतीचा प्रयोग करीत आहेत. यावेळी संत्रा कोबी, बागणी कोबी आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.

मखाना आणि मत्स्यव्यवसायातून त्यांना वर्षाकाठी लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे. आनंद सिंग हे कॅनडाच्या केशरी रंगाच्या कोबीच्या जातीची लागवड करीत आहेत. जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जातो. शिवाय उत्पादनावर केलेल्या खर्चाच्या तुलनेत 7 ते 8 पटीने उत्पन्न मिळते असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

Advertisement

खर्च २० हजाराचा आणि उत्पादन १.५ लाखाचे स्थानिक बाजारात केशरी आणि जांभळ्या कोबीचा भाव 50 ते 60 रुपये किलो असून स्टेफ्री 260 रुपये किलो आहे असे शेतकऱ्याने सांगितले आहे.

एक एकरात लागवड केल्यास 10 ते 12000 रुपये खर्च येतो तर उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे.

शिवाय त्यांनी अशा पध्दतीच्या कोबीच्या लागवड ते बाजारात विक्री संबंधित माहिती ही फेसबूक पेजवरून घेतली. आनंद यांनी ऑनलाइनद्वारे बियाणे मागवून शेतात केशरी कोबीची लागवड केली.

Advertisement

काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला? केंद्रीय विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. के. सिंह सांगतात की, केशरी कोबी ही मूळ जात ही कॅनडाची आहे. या जातीची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

यात ‘अ’ जीवनसत्व असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तर व्हिटॅमिन सी देखील यामध्ये मुबलकप्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते.

यापूर्वी ब्रिटन आणि फ्रान्समध्ये याचे उत्पादन होत असे. यात सर्व प्रकारची जीवनसत्वे असतात. कमी तापमानाच्या प्रदेशात देशात सर्वत्र या कोबीची लागवड करता येते.

Advertisement