ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मित्राला भेटायला आला आणि चतुर्भुज झाला

पुण्यासह राज्यात राज्यात अनेक ठिकाणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मूळच्या नेपाळमधील एका एजंटला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकानं सुरतमध्ये अटक केली. तो चार वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

मोक्कांचा आरोपी चार वर्षे फरार

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला सुरतमध्ये ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपी मागील चार वर्षांपासून फरार होता.

पुणे शहरात सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता.

हा आहे आरोपी

शिवा एजंट ऊर्फ शिवा रामकुमार चौधरी असं अटक केलेल्या 37 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मूळचा नेपाळमधील रहिवासी आहे.

15 दिवसांपूर्वी तो सुरतला आपल्या मित्राला भेटायला आल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना मिळाली होती.

या गुप्त माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची योजना आखली आणि पुणे पोलिसांचं पथक गुजरातला रवाना झालं.

शिवाची सेक्स रॅकेट चालवणारी टोळी

पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शखाली खंडणी विरोधी पथक गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते.

तिथून सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीनं पुणे पोलिसांनी शिवा चौधरीला अटक केलं आहे. संबंधित आरोपीच्या टोळीनं पुण्यासह राज्यभरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं होतं.

You might also like
2 li