वारकरी संप्रदाय हा जात, पात, धर्माच्या पलीकडं आहे. तो मानवता आणि ईश्वरधर्माला मानतो. त्यामुळं पालखी सोहळ्यात अनेक मुस्लिम सहभागी होतात.

वेगवेगळी काम करतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील विविध वस्तूंना चकाकी देण्याचं काम मुस्लिम मंडळी वर्षानुवर्षे करीत आहेत.

चकाकी देण्याचे काम सुरू

संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने १ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा असल्याने प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Advertisement

याही वर्षी पालखी रथामध्ये जाणार नसली तरी मंदिराच्या आवारात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून प्रदक्षिणा घालण्यात येणार असल्याने सालाबादप्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्याचे काम आज सुरू करण्यात आले आहे.

आठ कारागीरांचं काैशल्य

पालखी रथाबरोबरच पालखी व पादुकांच्या बरोबर या सोहळ्याबरोबर नेण्यात येत असलेली आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूड टक्के, समया, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महिरप नव्याने करण्यात येत आहे.

मंदिरातील चौकटी, दरवाजे, अभिषेकाचे व पूजेचे थाळ, चौरंग, पाट यांची पिंपरी येथील घनशाम ज्वेलर्स यांच्यावतीने ८ कारागीरांच्या मदतीने चकाकी देण्याचे काम केले आहे. हे त्यांचे सहावे वर्षे असून हे काम विनामूल्य सेवाभावी वृत्तीने करतात.

Advertisement

पालखी व पालखी रथाला चकाकी देण्यासाठी यंदाही स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश वापरण्यात आल्याची माहिती कुशल वर्मा यांनी दिली.

यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅन्टायझर आणि फिजिकल डिस्टंन्सचे पालन करीत सर्व कर्मचाऱ्यांनी चकाकी देण्याचे काम पूर्ण केले.

यासाठी १५ लिटर लिंबू चिंचपाणी, रिठा आणि काही चकाकी देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रसायनांचा वापर करत दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्याचा वापर करण्यात आला.

Advertisement

यांनी दिली चकाकी

यासाठी कुशल वर्मा यांच्या देखरेख व शोएब शेख यांच्या मार्गदर्शनाने सुनील दीक्षित, आरिफ मोमीन, अरबाज शेख, शहनवाझ खान यांनी सेवा भावी वृत्तीने चकाकी देण्याचे काम केले.