Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खंडणी प्रकरणात केंद्रीय राखीव दलाचा जवानही आरोपी

पैशाचा मोह भल्याभल्यांना पडतो. पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची काहींची तयारी असते. दोन तरुणांचे अपहरण करून, दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांत केंद्रीय राखीव दलाच्या जवानाचा समावेश आहे.

तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

पैशाच्या वादातून दोघा तरुणांचे फिल्मीस्टाईल अपहरण करुन एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत त्याला मारहाण केल्याची घटना सिंहगड येथे घडली आहे.

सिंहगड पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत आरोपींना वाकड येथील भुमकर चौकातून जेरबंद करून दोन्ही तरुणांची सुखरुप सुटका केली. अपहरणकर्त्यांकडून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

ही आहेत आरोपींची नावे

अविनाश पांडुरंग पाटील (३१,रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) व उत्तम तुरंबेकर (३१, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निखिल उदय गुरव (२६, रा. रॅप्टेक इंजिनिअरिंग कंपनीसमोर) यांनी फिर्यादी दिली आहे.

प्रभात तुकाराम तोडकर आणि अजित राऊत (कोल्हापूर) यांचे अपहरण केले होते. यातील प्रभातच्या डोक्यात बिअरची बाटली मारून जखमी केले.

प्रभात याचे फॅब्रिकेशनचे दुकान आहे, तर आरोपी उत्तम तुरंबेकर हा झारखंड येथे केंद्रीय राखीव दलात कार्यरत आहे. संदीप नावाच्या तरुणाकडे आरोपींचे पैसे होते.

तो मिळत नसल्यामुळे त्याच्या परिचयातील या दोघांचे अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादी-आरोपी परस्परांच्या ओळखीचे

फिर्यादी निखील व प्रभात हे एकमेकांचे रुम पार्टनर आहेत, तर अविनाश पाटील हाही गावाजवळ राहणारा असल्याने ओळखीचा आहे. यातील आरोपीही अविनाश व तुरंबेकर हेदेखील ओळखीचे आहेत.

ज्याच्याकडून आरोपींना पैसे वसूल करायचे होते, तो अपहरण करण्यात आलेल्या प्रभातचा मित्र संदीप पाटील हाही ओळखीचा आहे. प्रभात तोडकरला अविनाश, उत्तम हे मारहाण करीत असल्याचे दिसले.

त्यांच्या शेजारीच अजित राऊत हादेखील उभा होता. त्याला निखीलने विचारणा केली असता तू आमच्यामध्ये पडू नकोस, तुझा काही एक संबंध नाही, असे म्हणून अविनाशने त्याला जोरात ढकलून दिले.

दोन तासांत कारवाई

प्रभात याला तू आम्हाला संदीप कोठे राहतो तिथे घेवून चल असे सांगितले. दरम्यान, निखीलने तेथील अजित राऊत यास काय प्रकार चालू आहे ?

याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले, की आविनाश याने मलादेखील जीवे मारण्याची धमकी देऊन कोल्हापूरहून पुण्यात बोलावून घेतले. पैशांची मागणी करून मारहाण केलेली आहे.

यानंतर प्रभात आणि अजित या दोघांनाही जबरदस्तीने स्कुटरवर बसवून न-हेच्या दिशेने नेले. यानंतर थोड्याच वेळात प्रभातचा फिर्यादी निखीलला फोन आला, की त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारून जखमी केले आहे.

संदीपला फोन करून पैसे द्यायला सांग नाही तर हे लोक मला जीवंत सोडणार नाहीत. यामुळे निखील आणि संदीप यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

आरोपींना पोलिस आल्याचा संशय आल्याने ते पळून जात होते; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून अपहरण करण्यात आलेल्या दोघांची सुटकाही करण्यात आली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी ही कामगिरी केली

 

Leave a comment