पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) सावित्रीबाई फुले यांचा पुतळा (Statue of Savitribai Phule) बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. याच मुद्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनाही टोला लगावला आहे.

नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) विजयानंतर जे वक्तव्य केले होते त्याचा देखील समाचार भुजबळ यांनी घेतला आहे.

Advertisement

नारायण राणे यांनी मी सगळ्यांना पुरुन उरलोय असे वक्तव्य केले होते. याचाच समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्राचे मंत्री आहेत.

राज्य शासनाचे 50 हजार कोटी केंद्राकडे अडकून पडलेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडून फार अपेक्षा (Expectation) उंचावल्या आहेत. मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात, असा खोचक टोला छगन भुजबळांनी राणेंना लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल (Governor) यांच्या विषयीही भाष्य केले आहे. 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावे हा आमचा प्रयत्न होता.

Advertisement

पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिले. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हते. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती.

त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिले आणि काम पूर्ण झाले नसते तर ? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवले, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असेही छगन भुजबळ म्हणाले.

Advertisement