पुणे : राज्यात राज्यपाल (Governor) आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) या दोघांमध्ये सारखे कशावरून तरी खटके उडत असतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) सावित्रीबाई फुले यांचा पुतळा (Statue of Savitribai Phule) बसविण्यात आला आहे.

यावर भाष्य करताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आल्याचे स्प्ष्ट केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवले होते. असेही ते म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावे हा आमचा प्रयत्न होता. पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिले. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हते.

काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिले आणि काम पूर्ण झाले नसते तर ? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवले, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असेही छगन भुजबळ म्हणाले.

आता 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी 8 दिवस मिळताहेत चांगले काम करू.

Advertisement

राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.