गुन्हेगारांना जरब बसावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पुणे पोलिसांचा भर असून पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड भरण्यासाठी बँकेत घेऊन जाताना लूटमार करून ती पळवणा-यांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.

यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई

सय्यदनगर परिसरातील पेट्रोल पंपावरील रोकड बँकेत भरण्यासाठी ती लूटण्यात आली. उबेर अन्सार खान (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर), अरबाज नवाब पठाण (वय १९, रा. हडपसर), तालीम आसमोहमद खान (वय २०, हडपसर), अजीम उर्फ आंट्या महंमद हुसेन शेख (वय २२), प्रजोत कानिफनाथ झांबरे (वय २०, रा. हडपसर), शाहरूख उर्फ अट्टी रहिम शेख (रा. हडपसर) अशी ‘मोक्कां’अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

पावणेनऊ लाखांची रोकड लुटली

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात असलेल्या पेट्रोलपंपावरील मॅनेजर १४ जूनला पावणेनऊ लाखांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होते. त्या वेळी कोयत्याच्या धाकाने त्यांच्याकडील रोकड चोरून नेण्यात आली.

Advertisement

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून टोळीचा माग काढला होता. या टोळीविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पाठविला होता.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी टोळीवर ‘मोक्का’नुसार कारवाईला मान्यता दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरुद्ध केलेली ‘मकोका’ची ३७ वी कारवाई ठरली.

Advertisement