The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सीझन या वीकेंडपासून टीव्हीवर येत आहे. नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) कॉमेडी करताना दिसला होता. मात्र, तो यापुढे उर्वरित भागांमध्ये सहभागी होणार नाही.अलीकडेच चंदनने शो सोडल्याची बातमी समोर आली आहे. कपिल शर्मा आणि चंदन अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे या बातमीने प्रेक्षक थक्क झाले. आता चंदननेच शोमधून बाहेर होण्याचे कारण सांगितले आहे.

विश्रांती घेणे आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे – चंदन

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत चंदन म्हणाला, “गेल्या पाच वर्षांपासून मी या शोचा एक भाग आहे. केवळ वेळेमुळेच मी ब्रेक घेतला आहे. मला वाटतं जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टचा बराच वेळ भाग असता तेव्हा, विश्रांती घ्या आणि इतर गोष्टी करा. पण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मी वेब शोमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. तसेच मला माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे.” चंदनने गेल्या महिन्यातच डिजिटल पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. तो चित्रपट निर्माता लकी हंसराज दिग्दर्शित वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेचे नाव अद्याप ठरलेले नाही.

कपिलसोबत कोणतेही मतभेद नाहीत:

एक एपिसोड केल्यानंतर चंदनला शोमधून बाहेर काढण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. असे काहीही नसल्याचे चंदनने स्पष्ट केले. ते म्हणाले की, कधी कधी तुम्हाला काय करायचे हे ठरवता येत नाही. तो म्हणाला, “मी हा शो करण्याबाबत अनिश्चित होतो. मी एक एपिसोड केल्यानंतर निर्णय घेतला की मी ब्रेक घ्यायचा. लोकांनी यातून वेगळे काही घेऊ नये.”

कृष्णा अभिषेकही या सीझन बाहेर:(Krishna Abhishek out of show)

(kapil sharma) कपिलच्या शोच्या या सीझनमध्ये चंदनशिवाय कृष्णा अभिषेकही दिसणार नाही. या शोमध्ये तो (sapna) सपनाची भूमिका साकारत होता. निर्मात्यांसोबत झालेल्या कराराबद्दल बोलू शकत नसल्याचे कृष्णा म्हणाला होता. यामुळे तो शो सोडत आहे.याशिवाय (Bharti Singh) भारती सिंगही शोमध्ये कमी दिसणार आहे. ती ‘सारेगामा लिटिल चॅम्प’ (Saregama Lil Champ) या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत असून आई झाल्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे.

नवीन सिझनमध्ये अनेक नवे कलाकार सामील झाले:

यावेळी शोमध्ये अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. यावेळी शोमध्ये किकू शारदा (kiku sharda), सुमोना (sumona), अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) तसेच सृष्टी रोडे (Srushti rode), इश्तियाक, सिद्धार्थ सागर, मस्की श्रीकांत, गौरव दुबे असे नवे चेहरे दिसणार आहेत. या सीझनचा पहिला भाग 10 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित झाला. पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार पाहुणा म्हणून आला होता. शो व्यतिरिक्त कपिलच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दलही बरीच चर्चा झाली होती.