पुणे – मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील (Chandani Chowk) जुना पूल काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला. सध्या या पुलाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, जेव्हा हा पूल पाडण्यात आला तेव्हा तो संपूर्ण पूल पडला (Chandani Chowk) नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे.

पुलाचा (Chandani Chowk) सांगडा शिल्लक राहिल्यानं आता तो हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल रात्री 11 पासून पुणे, मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

सध्या या परिसरातील राडारोडा हटवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. स्फटोकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात आला. ड्रिगर दाबताच अवघ्या सहा सेकंदात हा पूल जमीदोस्त झाला.

दरम्यान, 1 हजार 350 डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही यावर अधिकारी आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद शर्मा म्हणाले, “ज्यावेळी हा पूल बांधण्यात आला त्यावेळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला”. असं ते म्हणाले आहे.

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली. 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक पुढं मार्गस्थ झाली.

चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एनडीए रस्ता – बावधन पूल पाडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पूल पाडण्यात आला.