पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौकात तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल पुणेकरांनी काही दिवसांपूर्वी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला होता.

दरम्यान, आता लवकरच हा बहुचर्चित चांदणी चौक (Chandani Chowk Pune) पाडण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. पुणे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे.

येत्या 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पूल (Chandani Chowk Pune) पाडण्यास सुरुवात होणार आहे. ते काम 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.

रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजताच महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणारा पुण्यातील चांदणी चौक (Chandani Chowk Pune) पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला असून, लवकरच या भागातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार असल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान, पूल पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोनशे मीटर अंतरावर कोणालाही उपस्थित राहता येणार नाहीये. याबाबतची सर्व जबाबदारी ही पुणे पोलीसांची असणार आहे.

ब्लास्ट झाल्यानंतर जवळपास 15 मिनिटे ही धूर बसण्यासाठीचा वेळ लागेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर ब्लास्ट शिल्लक राहिला आहे का याची खात्री केली जाणार आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 02 ऑक्टोबरच्या सकाळी 08 वाजे पर्यन्त सर्व पाडकाम केलेले साहित्य हटवण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.