पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौकात तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल पुणेकरांनी काही दिवसांपूर्वी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला होता.

दरम्यान, आता लवकरच हा बहुचर्चित चांदणी चौक (Chandani Chowk Pune) पाडण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. पुणे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे.

येत्या 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पूल (Chandani Chowk Pune) पाडण्यास सुरुवात होणार आहे. ते काम 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.

रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजताच महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार असून, नुकतंच या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे.

आज सकाळ पासूनच चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या छिद्रांमध्ये विस्फोटक भरण्याचे काम सुरू झाले. हे काम दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसांत सुमारे 1. 300 छिद्रांमध्ये 600 किलो विस्फोटक भरले जाणार आहे.

शिवाय हे करतानाच खालच्या बाजूस केवळ दगडच नाही, तर धूळदेखील उडू नये म्हणून विशिष्ट अशा जिओ पद्धतीचा वापर केला जात आहे, त्यामुळे कमीत कमी धूळ उडणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेवटच्या टप्प्यात पुलावर ड्रिलिंग करून तयार केलेल्या छिद्रांमध्ये बुधवारी रात्रीपासून विस्फोटक भरण्याचे काम सुरू झाले. शुक्रवारी रात्रीपर्यंत हे काम चालणार आहे.

आणि त्यानंतर शेवटी रविवारी पहाटे दोन वाजता पूल सेंट्रल ब्लास्टिंग पद्धतीने पाडला जाणार आहे. पूल पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोनशे मीटर अंतरावर कोणालाही उपस्थित राहता येणार नाहीये. याबाबतची सर्व जबाबदारी ही पुणे पोलीसांची असणार आहे.