पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौकात तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल पुणेकरांनी काही दिवसांपूर्वी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला होता.

दरम्यान, आता लवकरच हा बहुचर्चित चांदणी चौक (Chandani Chowk Pune) पाडण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली असून, येत्या 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पूल पाडण्यास सुरुवात होणार आहे.

मात्र, चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) हा उड्डाणपूल पडण्यापूर्वीच या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याची दिसून आली आहे. काल रात्री पुण्यात साडेदहाच्या दरम्यान भीषण वाहतून कोंडी झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

रात्री दहा वाजून 35 मिनिटांची चांदणी चौकामध्ये बाणेरच्या बाजूने आलेल्या दोन रूग्णवाहिकांना वाट मिळण्यासाठी हॉर्न वाजवत होत्या. मात्र बराच वेळ रुग्णवाहिकांना मार्ग मिळू शकला नसल्याचं समोर आलं आहे.

सध्या चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एक लेन बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत काही आपत्तीजनक प्रसंग आला,

अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका जायची असेल तर मार्ग कसा काढणार असा प्रश्न यावेळी उपस्थित झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, वाहतूक नियोजनकर्त्यांकडे देखील याबाबत स्पष्टता नसल्याचे यावेळी पाहायला मिळालं.

दरम्यान, काल सकाळ पासूनच चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या छिद्रांमध्ये विस्फोटक भरण्याचे काम सुरू झाले. हे काम दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसांत सुमारे 1. 300 छिद्रांमध्ये 600 किलो विस्फोटक भरले जाणार आहे.

शिवाय हे करतानाच खालच्या बाजूस केवळ दगडच नाही, तर धूळदेखील उडू नये म्हणून विशिष्ट अशा जिओ पद्धतीचा वापर केला जात आहे, त्यामुळे कमीत कमी धूळ उडणार आहे.