पुणे – दिवाळीच्या निमित्ताने नुकतंच ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ (Govind Bagh) येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padava) दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार गोविंदबाग (Govind Bagh) येथे नागरिकांना भेटले आणि दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.

यावेळी रोहित पवारांनी एक व्यक्तव केलं असून, सध्या त्यांच्या या व्यक्तव्याची राजकीयवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. “अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असे लोकांचे मत आहे.

माझेही हेच मत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहीत पवार यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आकड्यांचे समीकरण लक्षात घेणे महत्वाचे असून येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले होते. दरम्यान, त्यांच्या या इच्छेची खिल्ली उडवत मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

२०२४ पर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहणार का, काँग्रेस राहणार का, तुमच्या पक्षातील लोक तरी एकत्र राहतील का? असा सवाल करत आमदार रोहित पवार यांच्या विधानाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

अजित पवारांना २०२४ ला मुख्यमंत्री होण्यासाठी आधी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसला बहुमत आणावं लागेल. त्यासाठी तुम्ही एकत्र राहणार आहात का?

तुमच्या पक्षाचे लोक एकत्र राहणार आहेत का? याचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो, असा शब्दांत रोहित पवार यांची मंत्री चंद्रकातं पाटील (chandrakant patil) यांनी खिल्ली उडवली.

नेमकं रोहित पवार काय? म्हणाले…

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राष्ट्रवादीचा एखादा मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा होईल. राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) एकत्र लढतोय.

उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास याचा अधिक फायदा सर्वांना होणार आहे. त्यासंदर्भात निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेत असतात.मोठे निर्णय झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार त्यांना स्वीकारतात. पण, असा नेता असावा की, जो स्वतः निर्णय घेऊ शकतो. असं ते म्हणाले.