मुंबई : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supiya Sule) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याच मुद्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर टीका केली आहे.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे दारू पिऊन नाचतात आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे याही दारू पितात अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान केले होते.

या विधानानंतर अनेक पक्षातील नेत्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच कराडकरांनी माफी मागायला हवी असेही अनेक पक्षातल्या नेत्यांनी भूमिका घेतल्याचे दिसत होते.

Advertisement

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी हे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अनेक स्तरातून बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका होत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारची सवय असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, बंडातात्या कराडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दारूच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो, त्यामुळे आपण बोललो असे कराडकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

आता हा विषय संपवायला हवा. मात्र रोज एखादा नवा विषय काढायचा आणि लक्ष विचलित करायचे ही महाविकास आघाडीची सवयच असल्याची खोचक टीका पाटील यांनी केली आहे.

आमची भूमिका ही राज्यातील महाविकास आघाडी सरकारसारखी (Mahavikas Aghadi Goverment) नाही. आम्ही महाविकास आघाडी सारखे बोलत नाही.

आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालये चांगले आणि समजा निकाल विरोधात गेला तर सर्व भाजपाच्या इशाऱ्यावर अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे.

Advertisement

सीबीआयच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे. तपास बाजूने लागल्यास सीबीआय चांगली विरोधात गेल्यास सीबीआय भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीका होते.

मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही निलंबित बारा आमदारांची लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.

Advertisement