पुणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona Patients) पाहता लॉकडाउन (Lockdown) होणार की नाही या संभ्रमात सर्वजण आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मास्क (Mask) नसेल तर ५०० ऐवजी ५००० दंड (Penalty) घ्या पण लॉकडाउन नको असे सांगितले आहे.
राज्यात आणि जिल्ह्यात कडक निर्बंध (Strict restrictions) लावण्यात आले आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कडक निर्बंध लावण्यासाठी कोणाचीही असहमती नाही. कडक निबंध लावा पण लॉकडाउन नको असे ते म्हणाले आहेत.
बोलताना ते म्हणाले, कोरोना (Corona) हा संपण्याच्या दिशेने चालला आहे. कोरोनाचे स्वरुप भयावह नाही. कोरोना नॉर्मल सर्दी, खोकल्यासारखा झाला आहे.
त्यावर आजच चांगली गोळीही आली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन करणे योग्य होणार नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
लॉकडाउनला मात्र आता कोणीही तयार होणार नाही. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरतील. दोन वर्षे हा माणसाच्या जीवनातील फार मोठा कालावधी आहे. विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक सफर झाले.
त्यांनी दोन वर्षे सहन केले. त्यामुळे सर्व रुटीन चालू ठेवायचे पण काळजी घ्यायची. मास्क नाही लावला तर 500 च्या ऐवजी 5 हजार रुपये दंड करावा. त्यातून सर्वसामान्यांना मेटाकूटीला आणाल.
परंतु, कडक निर्बंध लादावेत. लग्न समारंभ, संभा संमलने 50 लोकांच्या उपस्थित करावेत. ऑफीस बंद करा, 50 टक्के उपस्थिती ठेवा, दुकाने, शाळा, कॉलेज बंद ठेवल्याने काही होणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमंही बोलताना सांगितले आहे.