पुणे – भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) नुकतेच पुण्यात (pune) होते. एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात दाखल झालं होते. मात्र, चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) कार्यक्रमस्थळी येताच मोठ्या आवाजात स्पीकरवर “राष्ट्रवादी पुन्हा…” (ncp election song) हे गाणं वाजण्याच्या आलं असल्याचं दिसून आलं आहे. बरं गोष्ट एवढ्यावर संपत नाही. पोलिसांनी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला अटक सुद्धा केली आहे.

झालं असं की, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातल्या रास्ता पेठेत आले होते.

पाटील कार्यक्रमस्थळी येताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत (ncp election song) लावलं. यानंतर उपस्थितांमध्ये थोडासा गोंधळ कुजबूज झाली आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतलं.

सध्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या प्रचारगीताचा वापर केला जातो. भारतीय जनता पक्षाचा मोठा विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गाणे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात स्वागतालाच वाजविण्यात आल्याने उपस्थितांमध्ये त्यासंदर्भात उलट सुलट चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी हे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी, त्याने साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं कारण दिलं आहे.