पुणे – पुणे शहराचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या कोथरूड (kothrud) मधील कार्यालया जवळ लावलेला फलक अज्ञात व्यक्तीने फाडला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोठा गोंधळ निर्मण झाला असून, याप्रकरणी अलंकार पोलिस (police) ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार असल्याने पाटील यांचे कार्यालय बंद होते. दरम्यान फलक फाडण्यात आल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती कार्यालयातील एका व्यक्तीने दिली आहे.

थंडीच्या पार्श्वभूमीवर मोफत स्वेटर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात शनिवार पासून नाव नोंदणी करण्यात येत असून, त्यासंबंधी माहितीसाठी हा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, तो फाडण्यात आला आहे.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. त्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे आणि भाजपचे (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सरकारने पालकमंत्रीही घोषित केले असून, पुणे शहराचे पालक मंत्री म्ह्णून चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे पुण्याचा कारभार पाहत आहेत.

कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांचा विजय…

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी लढत दिली. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला.

चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 4 हजार मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 79 हजार मतं मिळाली. चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, शेवटी या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला.