पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक केले आहे. यावर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोधी पक्षला टोला लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण केले आहे. या वेळी त्यांनी शरद पवार या वयात आजारी असूनही पक्ष व सामान्य माणसांच्या अडचणींसाठी नेहमी धरपड करत असतात. त्यांच्याकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काहीतरी शिकले पाहिजे. असे मोदी म्हणाले होते.

त्यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला सल्ला दिला आहे. पाटील म्हणाले की, तो मोदींच्या मनाचा मोठेपण आहे. त्यांच्याकडून काही तरी शिका मोदी आपला विरोधक जरी असला दुष्मन जरी असला तरी त्याच्याबद्दल जे चांगल आहे त्याच कौतुक करतात.

Advertisement

तुम्हाला चांगल्याच कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. तसेच मोदींवर टीका करणाऱ्यांनाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींच एवढेच म्हणणे आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असे सांगण्याचा जो प्रयत्न झाला.

त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग (Corona Infection) वाढला. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही.

Advertisement

महाराष्ट्रच (Maharashtra) नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले. महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा असेही पाटील म्हणाले.