महाविकास आघाडी सरकारला चंद्रकांत पाटील यांनी परीक्षांचे घोटाळे, शेतकऱ्यांची उपेक्षा यावरून सवाल उपस्थित केले होते. त्याचसोबत आता आता वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुनही त्यांनी सरकारला फटकारल आहे.
वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पोराला तुम्हाला दारुच्या नादाला लावायचंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.तसेच गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती मदत केली? कर्जमाफी तर केली नाही.. यांना शेतीतलं काय कळतंय, असा म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे.
सोबतच संजय राऊत यांनाही चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. 12 आमदारांच्या राज्यपाल नियुक्तीचा आणि या निर्णयाचा काहीही संबंध नाही.
संजय राऊत तुम्ही शपथ देत नाही,मुख्यमंत्री आणि आमदारांना.. राज्यपाल हे सर्वोच्च पद घटनात्मकदृष्ट्या मोठं पद आहे. फुले, शाहू आंबेडकरांचं नाव राऊत प्रत्येक वेळी भाषणात घेतात.
पण राऊतांच्या ओठात आंबेडकर आहेत, पण पोटात काय? तर बाबासाहेबांची घटना मान्य नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
दरम्यान बारा आमदारांचं निलबंन रद्द झाल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसंच सुप्रीम कोर्टाचे आभारदेखील मानले आहेत. आणि कोर्टाच्या निर्णयानंतर ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला सुनावले आहे.