मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकासआघाडी सरकार कोसळणार या भविष्यवाणीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

भुजबळ म्हणाले की तुम्ही पाटील आहात. जोशीबुवांचे काम कधीपासून करायला लागलात? अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक ठिकाणी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Advertisement

यासोबतच छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या उपोषणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यांच्या सचिवांनी अण्णांसोबत चर्चा केली आहे. त्यांची बैठक अजूनही सुरू आहे. त्यात काय निर्णय होतो ते पहाणार आहोत,असे ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकार १० मार्चनंतर जाणार असल्याचं म्हटले होते.ते म्हणाले की आयपीएस अधिकारी परमवीरसिंग (Paramvir Singh) यांनी सांगितले की, सचिन वाझे (Sachin Waze) याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दबाव आणला होता.

या गंभीर आरोपानंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय (CBI) चौकशीचा आदेश दिला होता.

Advertisement

तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल’, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.