पुणे : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप आणि टीका करत असतात. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे (Pune) पालकमंत्री (Guardian Minister) अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचे काम केले आहे असे आरोप पाटलांनी केले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अडाणी म्हाताऱ्या माणसालाही हे माहिती आहे की ६ हजार रुपये मोदी देतात. आता मग तो मत मोदींना देणार की पवारांना देणार? की ज्यांनी आयुष्यभर पैसे लोकांचे पैसे काढून घेण्याचंच काम केले.

Advertisement

जमिनी काढून घेण्याचं काम केले. मला असे कळले की मांजरीवाल्यांना काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात आले होते. तेव्हा ते नको बोलले कारण पवार आमच्या जमिनी लाटून घेतात.

म्हणून पुन्हा ते महापालिकेतून काढून घेण्यात आले. एकदा गेले होतो महापालिकेत पण अजित पवारांची इतकी भीती की, म्हणाले आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि घेऊन जातील.

ते हेलिकॉप्टरने वरुन बघतात की कुणाकुणाच्या जमिनी शिल्लक आहेत. धरणाच्या सोडत नाहीत, कशाच्याच सोडत नाहीत. त्यामुळे लोकांना हे कळते की मोदी (Modi) 6 हजार रुपये देतात, कोरोना लस देतात,

Advertisement

गरोदर स्त्रिला 6 हजार रुपये देतात, रेशन फ्री देतात, टॉयलेट फ्री देतात, गॅस फ्री देतात’, असे अनेक आरोप चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केले आहे.