Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चंद्रकांतदादा म्हणतात, ‘मला क्लिप मिळाली, मी ऐकली; पण युतीच्या निर्णय केंद्रातून!’

राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एक दोन दिवसांत माझी राज ठाकरे यांच्याशी भेट होणार आहे.

माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

मुझे तो आम से मतलब है. किससे मिली क्या मतलब?

मेरे को क्लीप मिली. मैने सुनी, असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. मी ती क्लिप ऐकली आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर ठेवेन. मुझे तो आम से मतलब है. किससे मिली क्या मतलब?

Advertisement

असं सूचक विधान करतानाच मेरे को क्लिप मिली. मैने सुनी; पण युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमचा पक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहे. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.

परप्रांतीयांना होणारा विरोध हा अडसर

मनसेच परप्रांतीयांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली, तर मी ओके देईन, असं त्यांनी थेट सांगितलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

विशेष म्हणजे ही युती पालिका निवडणुकांसाठी राहणार नसून लोकसभा आणि विधानसभेतही राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात आणि राज-चंद्रकांतदादांच्या भेटीत नेमकं काय ठरतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Advertisement

 

Leave a comment