ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

चंद्रकांतदादांचा शिवसेनेवर निशाणा; रस्त्यावर उतरून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे ५६ आमदार आणि १८ खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची तोंडाला पट्टी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली, म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले. विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली’, अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडीकडून दिशाभूल

तालिका अध्यक्ष पीठावरून उतरल्यावर इतर आमदारांप्रमाणेच साधा आमदार असतो. भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झालेली नाही आणि झाली असलीच तरी ती तालिका अध्यक्षांना झालेली नाही.

त्यामुळे हा प्रश्न त्वरित समन्वयातून मार्गी लावला होता; मात्र त्याबाबत महाविकास आघाडीतील नेते महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, असा आरोप पाटील यांना केला.

तालिका अध्यक्ष पीठासनावरून उतरल्यावर काही प्रकरण झाले असेलच, तर त्यावरून कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन नियमबाह्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

आमचा आवाज दाबू शकणार नाही

ओबीसी समाजाच्या मनातील रोष विधानसभेत मांडल्याबद्दल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले गेले.

या निलंबनाच्या निषेधार्थ आज विधानसभेच्या पायऱ्यांवरच भाजपच्या वतीने अभिरूप विधानसभा भरवण्यात आली, असे सांगताना ठाकरे सरकारची मनमानी आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

हिंमत असेल तर गुप्त मतदान पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊन दाखवा. घटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानेच व्हायला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

You might also like
2 li