ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ५२ कारखान्यांची तक्रार केली,

त्यात केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधा-यांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे.

याचिकेत असलेल्या कारखान्यांचीच दिली यादी

पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. शाह यांना 52 साखर कारखान्यांची नावे दिली असून याबाबात चौकशी करण्याची विनंती केली आहे. या पत्रामध्ये गडकरी यांच्या मुलाच्या मालकीच्या दोन कारखान्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. याप्रकरणी अधिवेशनाच्या आधी पाटील स्पष्टीकरण दिले आहे. सात-आठ वर्षांपूर्वी राज्य सहकारी बँकेने कर्ज दिलेले कारखाने तोट्यात दाखवून, त्यांचा लिलाव काढून, कमी किंमतीमध्ये खरेदी करून कितीतरी अधिक कर्ज काढण्यात आले. तरी कारखाने नाही चालले तर ते विकले. अशाप्रकारचा स्कॅम झाला. यावर काही वर्षांपूर्वी एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये कोणते कोणते कारखाने राज्य सरकारने कमी किंमतीमध्ये विकले याची यादी दिली. या यादीला कोट करून मी शाह यांना पत्र लिहिले, की याबाबत चौकशी व्हायला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

Advertisement
बँकेने ठरविलेल्या किंमतीपेक्षा जादा दराने खरेदी

या यादीमधील दोन कारखाने नितीन गडकरी यांनी विकत घेतलेले आहेत; पण ज्या वेळी उच्च न्यायालयात सात-आठ वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच वेळी गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, की बँकेने ठरवलेल्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक किंमतीने हे मी विकत घेतले आहेत. यावर अवाच्या सव्वा कर्ज काढलेलं नाही. लोकांच्या आग्राहास्तव मी कारखाने घेतले आहेत.’ मीही या मुद्दावर नवीन काही म्हटलेलं नाही. उच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली आहे. जे कारखाने मातीमोल किंमतीनी खरेदी करण्यात आले आहेत, त्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. गडकरी यांच्या कारखान्याच्या चाैकशीचा त्यामुळे संबंधच येत नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांतदादांनी दिले आहे