पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील मेट्रोतून (Pune Metro) सफर केली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही प्रश्न उपस्थित करत पवारंवार टीका केली आहे.

स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल (Metro Trial) कशासाठी घेतली. असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवारांदबद्दल आम्हाला कायमच आदर आहे असे पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमंही बोलताना, ट्रायल घेतली तरी त्यासाठी फक्त पवारच का केले? पुण्यात आठ आमदार (MLA) आहे. दोन राष्ट्रवादीचे, सहा भाजपचे आमदार (BJP 6 MLA) आहेत.

Advertisement

खासदार बीजेपीचे आहेत. राज्यसभा सभासद प्रकाश जावडेकर बीजेपीचे आहेत. पिंपरी चिंचवडला (Pimpari Chinchwad) शिवसेनेचे खासदार, एक राष्ट्रवादीचे एक भाजपचे आमदार आहेत.

पण हे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला समजत नाही का? तुमच्याकडे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य होते, तेव्हा तुमच्या काळात तुम्ही हा प्रकल्प का नाही पूर्ण केला?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadanvis) झाल्यावर त्यांनी सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवणे, कर्जासाठीचे करार करणे, केंद्र सरकार, राज्य सरकारांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Advertisement

पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ११ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने 8 हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. 3 हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते.

Advertisement

पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली? असे म्हणत पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, मेट्रो कंपनी (Metro Company) विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार आहे. तसेच त्यांनी आमदार आणि खासदारांना देखील हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचे आव्हान केले आहे.

Advertisement