Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गांधीद्वेषातून ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल : नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरू-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे.

मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली.

Advertisement

पटोले म्हणाले की, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती. त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता.

त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, केवळ गांधीद्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिल्याचे या वेळी पटोले यांनी या वेळी सांगितले.

Advertisement
Leave a comment