file photo

पुणे : भुरट्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. नुकतेच या चोरांचा निवृत्त पोलिसास फटका बसला आहे.

भामट्याने एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून निवृत्त पोलिसाची सव्वालाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच वानवडी परिसरात घडला.

याप्रकरणी निवृत्त पोलीस माधव ज्ञानदेव धायगुडे (हडपसर ) यांनी वानवडी पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर असे कि, धायगुडे आणि त्यांचा मुलगा जगताप चौकातील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते.

Advertisement

परंतु एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यावेळी तेथे असलेल्या अज्ञात आरोपीने त्यांना आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे सांगितले.

धायगुडे त्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना त्या तरुणाने बोलण्यात गुंतवून त्यांचे कार्ड बदलले. त्या माध्यमातून त्याने एटीएममधून १ लाख ३० रुपये काढून फसवणूक केली.

Advertisement