ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळवर आरोप निश्चित

इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक असलेल्या यासीन भटकळसह एजाज सईद शेखवर मुंबईतील तिहेरी बाँबस्फोट प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

आता या तिघांना काय शिक्षा होते,याकडे लक्ष लागले आहे. त्यांना अगोदरच हैदराबाद बाँबस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोक्का न्यायालयात सुनावणी

मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी यासिन भटकळसह दोघांवर आज विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले.

दहा वर्षांपूर्वी झालेल्या या बॉम्बस्फोटामुळं मुंबई हादरली होती. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.

आरोप नाकारले

मोक्का, युएपीए (अतिरेकी कारवाया) यांसह हत्या, कट कारस्थान, हत्यारे कायदा आदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.

दोन्ही आरोपी सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहेत; मात्र आरोपींनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. हैदराबाद बॉम्बस्फोट खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने खडसावले

मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट खटल्यासाठी तेथील न्यायालयात हजर करा अशी मागणी आरोपींनी केली होती; मात्र फाशीची सुनावल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हजर करण्यासाठी न्यायालयाने नकार दिला.

भटकळला अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते; मात्र आरोप निश्चित करण्याबाबत त्याने नकार दिला होता.

यामुळे खटल्याला विलंब होत असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाने खडसावल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोप निश्चित करायला भटकळने सहमती दिली.

You might also like
2 li