ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

त्या’ विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात लवकरच चार्जशीट

सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोकर तालुक्यातील बटाळा येथे १९ मे रोजी घडली होती.

या प्रकरणात भोकर पोलिस लवकरच आरोपीविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बटाळा येथील प्रकाश भावराव कापसे यांची मुलगी जयश्री यांचा माहेरहून पैसे आणण्यासाठी पती गजानन कलूरकर (रा.भिसी, ता.किनवट) याच्यासह सासरे नागोराव विठ्ठल कलूरकर व सासू सुनंदा कलूरकर हे छळ करत होते.

सततच्या जाचास कंटाळून जयश्री यांनी माहेरी बटाळा (ता.भोकर) येथे आल्यावर १९ मे रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.

दरम्यान, प्रकाश भावराव कापसे यांच्या फिर्यादीवरून पती गजाननसह सासरे व सासू या तिघांविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.पती गजानन फरार होता.

दरम्यान, ९ जून रोजी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यापूर्वी सासूलाही जामीन मंजूर करण्यात आला होता. तत्पूर्वी सासरे विठ्ठल कलूरकरचा जामीन भोकर न्यायालयाने फेटाळून लावला होता.

दरम्यान, या प्रकरणात पोलिस लक्ष देत असून तपास करण्यात येत आहे. लवकरच चार्जशीट दाखल होईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांनी सांगितले आहे.

You might also like
2 li