मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल (Complaint) करण्यात आला आहे. कलम 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस (police) स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर IPC सेक्शन 506 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन आणि मेसेजद्वारे धमकावल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे तक्रारदराने पोलिसांनी सांगितले आहे.

छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) त्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही तक्रारदार टेकचंदानी यांनी तक्रारीत सांगितले असून, पोलीस देखील पुढील तपास करत आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले होते.?

“शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं’. तसेच त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा सुद्धा उल्लेख केला.

“सरस्वती पूजन करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेटचे पूजन करायला हवे कारण सरस्वतीचे शिक्षणातील योगदान फक्त तीन टक्के आहे” असं ते म्हणाले आणि तेव्हा पासूनच या नवीन वादाला तोंड फुटले.

तर हिंदुविरोधी बोलत असलेला त्यांचा हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या या विधानावर अनेक राजीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत त्याचा विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात यावरून वातावरण सुद्धा तापले आहे.