नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal elections) वारे सध्या वाहताना दिसत आहे. नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि नाशिकचे (Nashik) पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.

महापालिका निवडणूक लढवण्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेण्याचे सत्र सध्या सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Corporation Election) स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही सुरु केली आहे.

Advertisement

भुजबळ म्हणाले की, लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे.

आगामी निवडणुका लढताना भाजप (BJP) वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे.

मात्र, सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.

Advertisement

प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचेही राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.