मुंबई – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका होत असून, अश्यातच आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. ते शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलत होते.

“सावित्रीबाई फुले (savitribai phule) कपाळावर मोठे कुंकू लावायच्या. मग त्यांच्यावर शेण, चिखल का फेकण्यात आला? असा सवाल छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी यावेळी केला आहे.

छगन भुजबळ नेमकं काय? म्हणाले वाचा…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात शेती करत होते. माध्यमांनी ते दाखवलं. मला वाटलं की मनोहर भिडे हे तुमच्या शेतामध्ये माझ्या अंब्याची झाडे लावा, असे सांगायला शिंदे यांच्याकडे गेले असतील. मात्र भिडे मुख्यमंत्र्यांना भेटून काय बोलले हे विचारावे लागेल.

या (मनोहर भिडे यांचे कुंकू लाव विधान) लहान लहान गोष्टी नाहीयेत. या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या जातात. मला त्यांना विचारायचे आहे की, सावित्रीबीई फुले फार मोठं कुंकू लावायच्या.

सावित्रीबाई यांच्या कपाळावर मोठे कुंकू होते. मग त्यांना का दगड मारले. त्यांच्यावर चिखलफेक का झाली. त्यांच्या कपाळावर मोठं कुंकू होतं ना?” असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

संभाजी भिंडे काय म्हणाले होते…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,”

यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.