पुणे : एसटी संपावरून (ST Strike) राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात बैठक झाल्यापासून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे.

यामध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उडी मारली आहे. त्यांनी शरद पवार यांची पाठराखण करत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार साहेबांची कोणाला अॅलर्जी असण्याचे कारण नाही. त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी गोपीळचंद पडळकरांना चोख उत्तर दिले आहे.

Advertisement

दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) संप सुरु आहे. त्यामध्ये काळ शरद पवार यांनी काल पुढाकार घेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली आणि कर्मचाऱ्यांना संप माघे घेण्यासाठी सांगितले होते.

त्यावर गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनाही सल्ला दिला आहे. ते म्हणाले शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढे जाऊन संप मिटवा असा सल्ला त्यांनी परब यांना दिला आहे.

प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे.

Advertisement

गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असे कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणे योग्य नाही याचीही आठवण भुजबळांनी पाडळकरांना करून दिली आहे.