पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. आणि निमित्ताने शिवजयंती महोत्सव समिती तर्फे दिवाळी (Diwali) पाडव्याच्या दिवशी “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव” (chhatrapati shivaji maharaj dipotsav) पर्व ११ वे चे आयोजन श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस शाळा प्रांगण, शिवाजीनगर (Shivajinagar) येथे करण्यात आले आहे.

शिवछत्रपतींचा (chhatrapati shivaji maharaj) हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते.

पुतळ्याचे यंदा ९५ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली आहे.

दरम्यान, या दीपोत्सवाचे आयोजन अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, दीपक घुले, यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.

यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावून दिवे लावले आणि हा संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. दरम्यान, यावेळी दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ, तुतारीची ललकारी, सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर पुणेकरांना अनुभवाला मिळाला.

विविध मान्यवरांचा करण्यात आला गौरव :

सरदार हिमंतबहाद्दर विठोजी चव्हाण, श्रीमंत सरदार गरुड घराणे, चंद्रवंशी श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, श्रीमंत निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ,

श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर ह्या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभाग घेऊन यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात आला.