मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आज अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली आहे.

पहाटेपासून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे.

मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

तसंच ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचंही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं. मंगळवारी दुपारी शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती केली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार (Chief Minister Eknath Shinde) स्वीकारणार आहेत. यानिमित्तानं मंत्रालयातलं सीएम कार्यालय सजविण्यात आलं आहे.