Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

वाहतूक पोलिसांच्या ‘चिरीमिरी’ विरोधात नागरिक सजग

सरकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावरील संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ई-मेल तसेच प्रत्यक्ष जाऊनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामध्ये वाहतूक पोलिसांकडून लाचेची मागणी केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकाला अडविल्यानंतर त्याचवेळी ‘तोडपाणी’ करण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात सापळा रचून कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.

चिरीमिरीविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले

‘सिग्नल तोडल्याचा दंड बाराशे रुपये आहे… तुम्हाला मात्र, पाचशे रुपयांमध्ये सोडतो’, ‘तुमच्या वाहनाचा पीयूसी नाही, तुम्हाला दंड भरावा लागेल,’ आदी कारणे पुढे करून सावज शोधणाऱ्या वाहतूक पोलिसांविरोधातील तक्रारी ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’कडे (एसीबी) वाढल्या आहेत.

Advertisement

नंतरची धावाधाव टाळण्यासाठी आणि चिरीमिरी घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी काही ‘चाणाक्ष’ वाहतूक पोलिसांकडून जागेवरच तोडगा काढण्यात वाकबगार झाले आहे.

त्यांच्याविरोधात सापळा रचून कारवाई करण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी जागरूक पुणेकरांकडून ‘एसीबी’ची पायरी चढण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

असे हेरले जाते सावज…

वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला पकडल्यानंतर त्याचा वाहतूक परवाना तपासण्यात येतो. वाहनचालक परप्रांतीय, ग्रामीण भागातील असेल तर त्याच्या देहबोलीवरून तो ‘सावज’ असल्याचा अंदाज बांधण्यात येतो.

Advertisement

वाहनचालक पक्का पुणेकर असल्याचे लक्षात आल्यास संबंधितांकडे दंडाची रक्कम भरून घेऊन सोडण्यात येते.

‘सावजा’ला आधी दंडाची रक्कम अमूक तमूक असून एवढ्या रकमेत सोडतो, अशी लालूच दाखविण्यात येते. कुठलाही आधार नसलेल्या ‘सावजा’कडून ‘तोडपाणी’ केल्यानंतर त्याला अलगद सोडून देण्यात येते.

काय होते तक्रारीचे?

वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांविषयी आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे शक्य असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लगेचच कारवाई करण्यात येते.

Advertisement

ज्या तक्रारींवर कारवाई करणे शक्य नाही, त्या तक्रारी संबंधित पोलिस प्रमुखांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात.

 

Advertisement
Leave a comment