Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

माय लॅबचे बनावट ‘ डोमेन ‘ बनवून नागरिकांची फसवणूक

पुणे : विविध आजारांचे निदान करणाऱ्या माय लॅब या कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरातमधील दोघांना अटक केली आहे.

संस्कार संस्कृत उर्फ रुषी (वय १९) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुटू (वय २४, दोघेही रा. जामनगर, गुजरात) ही संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार भावेश पासवान याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

तपासासाठी त्यांना येत्या २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. चेतन सोनराज रावळ (वय ३४, रा. बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०२९ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली.

Advertisement

आरोपींनी या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करून त्यासारखे हे नवीन डोमेन तयार केले. त्याद्वारे त्यांनी बनावट सेल्स ऑर्डर तयार केली. तसेच आरोपींनी एक बनावट फेसबुक पेज तयार करून

त्यामार्फत फिर्यादीची कंपनी ही कोरोनाच्या चाचणी कीट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ई-मेल, बँक खाती, फोन नंबरद्वारे लोकांची फसवणूक केली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण याप्रकरणी तपास करीत आहेत.

Advertisement
Leave a comment