भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे १९ बंगले रायगड जिल्यातील कोर्लई (Corle) गावात आहेत असे म्हटले होते. त्यासंदर्भात ते आज या गावात येऊन माहिती गोळा करत आहेत.

सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेना (shivsena) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले कार्यकर्ते पाहता अलिबाग पोलिसांकडून (Alibag Police) याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

Advertisement

परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनीच सोमय्यांना आटोपते घ्यायला सांगितले होते.

त्यामुळे अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर कोर्लई ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून स्वच्छताही करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांना मुद्दामहून किरीट सोमय्या घेऊन आल्याचे आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली आहे.

Advertisement

पण वाढती तणावाची परिस्थिती पाहता किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला. यावेळी गावाला बदनाम करण्यासाठी आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कार्यकर्त्यांसह किरीट सोमय्या आल्याचा आरोपही सरपंच प्रशांत मिसाळ केला आहे.

हा दौरा किरीट सोमय्यांनी १८ बंगले गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यासाठी केला होता.

याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांना बंगले कुठे आहेत ? असे आव्हान पत्रकार परिषदेमध्ये केले होते.

Advertisement