पुणे – अनेकांना साफसफाईची सवय असते. दररोज घराची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. पण आपण घरातील फरशी आणि इतर वस्तू साफ करतो, पण खिडक्या-दारांच्या (windows) काचा साफ करणे हे मोठे काम असते. काचेच्या खिडक्याही (windows) लवकर घाण होतात. गलिच्छ खिडक्या साफ करण्यासाठी लोक महागड्या काचेच्या क्लीनरचा (Cleaning Tips) वापर करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला असे काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरातील काच अगदी नवीन (Cleaning Tips) सारखी चमकेल.

बेकिंग सोडा :

किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडाच्या मदतीने घराच्या खिडक्यांच्या काचा साफ करता येतात. यासाठी मऊ कापडावर थोडासा बेकिंग सोडा लावून काचेवर चोळा. यानंतर स्वच्छ सुती कापड आणि पाण्याने खिडक्या स्वच्छ करा.

व्हिनेगर :

घरातील काचही तुम्ही व्हिनेगरच्या वापराने स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरा. आता जेव्हाही साफसफाई करायची असेल तेव्हा खिडक्यांच्या काचेवर फवारणी करा आणि स्वच्छ कापडाने पुसून टाका.

डिश शोप :

स्वयंपाकघरात भांडी धुतल्या जातात ते डिश शोप. खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठीही (Cleaning Tips) याचा वापर करता येतो.

यासाठी एका स्प्रे बाटलीत पाण्यात मिसळा. आता खिडकीवर फवारणी करा. त्यानंतर कापडाने घासून घ्या. तुम्हाला दिसेल की विंडो साफ झाली आहे.

मीठ :

मिठाचा वापर करून तुम्ही खिडकीची काच पॉलिश देखील करू शकता. यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळून द्रावण तयार करा. आता ते गलिच्छ काचेवर ओतून स्वच्छ करा. मिठात असलेली रसायने घाण साफ करण्यास मदत करतात.