मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर येत आहे. 5 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. वर्ष 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देण्यासाठी आले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. त्यानंतर यंदा अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

यावेळी ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. तसेच, अमित शाह (Amit Shah) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत, त्यांची भेट घेणार का? असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारण्यात आला.

त्यावर शिंदे म्हणाले की, “अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती आहे. आपल्याला माहितच आहे की, सरकराच्या पाठिशी…; असं म्हणत शिंदेंनी (CM Eknath Shinde) सूचक विधान केलं.

तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भक्कम पाठिशी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

दरम्यान, राज्यात मनसे-भाजपा युती झाल्यास ही युती शिवसेनेला मोठी अडचणीची ठरू शकते हे नक्की. नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.

शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

अमित शाह आपल्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान ‘सागर’ बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांचीदेखील भेट घेणार आहेत.