ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य सरकारमधील तीनही पक्षांत एकवाक्यता नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शह-काटशहाचे राजकारण सुरूच आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्थगिती देऊन चेकमेट दिला आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयाला मिळणार होत्या शंभर सदनिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाला शंभर सदनिका देण्याच्या आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

पवारांच्या हस्ते चाव्या सुपूर्द

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या; मात्र आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळं आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

निर्णयाला स्थगिती दुर्दैवी

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत आव्हाड म्हणाले, की आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता; पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे.

याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही.

म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.

रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाइकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता.

You might also like
2 li