राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.२९) चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी हे वक्तव्य स्वत: झोपेत असताना केलेय की जागे असताना, असा टोला पवार यांनी लगावला.

लोक झोपेत असताना महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.

तेव्हापासून पाटील यांना ते असह्य झालंय आपल्या जागा जास्त असताना देखील सरकारमध्ये नाही, याची बोचणी लागली आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, आमचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

जोपर्यंत हा निर्णय कायम आहे, तोपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यातील लॉकडाऊन हटविण्याच्या प्रश्नावर पवार यांनी मुख्यमंत्री यासंबंधी ३६ जिल्ह्यांचा आढावा घेऊन निर्णय घेतील. तर अजूनही काही जिल्ह्यांत रुग्णांची संख्या जास्त आहे.

बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय सुरू होणार ही बातमी चुकीची असून शहरात काही नवीन करायचे झाले तर आपल्याकडे जागा उपलब्ध आहे का ते बघून पुढील निर्णय घ्यावे तरी महाविद्यालयाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. लसीकरणाविषयी पवार म्हणाले, प्रत्येकाला लस मिळावी ही आमची भूमिका आहे.

त्यासाठी राज्याने ६५०० कोटींची तरतूद केली आहे. परंतु, दुदैवाने आपल्या देशात ज्या कंपन्या लस तयार करतात, त्यांच्याकडून तेवढा पुरवठा होत नाही. केंद्राने ४५ वर्षांवरील व्यक्तिंना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्यांनी १८ वर्षांवरील व्यक्तिंना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

परंतु, तेवढी लस नसल्याने अडचणी आहेत. परदेशात जी लस तयार होते, ती आणण्यास केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे विविध नेतेमंडळींच्या भेटी घेत आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ते भेटले. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अन्य वर्गाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे.

Advertisement