Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

लोणकर कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा धीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भावी अधिकारी स्वप्नील लोणकर याला निवड होऊनही नियुक्ती न दिल्याने त्याने आत्महत्या केली.

त्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबीयांना धीर दिला.

Advertisement

स्वप्नीलच्या बहिणीला मदत करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नीलने आत्महत्या केली.

त्यानंतर स्वप्नीलचे आई, वडील आणि बहिण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले.

तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

Advertisement

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

ठाकरे यांनी स्वनीलची आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली.

घटना दुर्देवी आहे; पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.

हे होते उपस्थित

या वेळी सह्याद्री अतिथीगृहावर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

Advertisement

भाजपची टीका

लोणकर कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं..

 

Advertisement
Leave a comment