महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’चा दर दोन रुपयांनी वाढवला असून, दोन ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशावरील इंधन खर्चाचा भार आणखी वाढणार आहे.

सीएनजी, पीएनजीसाठी निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या कच्चा मालाच्या (नैसर्गिक वायू) दरात वाढ झाल्याने ‘एमएनजीएल’ने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात ६२ टक्क्यांनी वाढ केल्याचे पुरवठादार कंपन्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेत सध्या केलेली दरवाढ ही कमीच असल्याचेही कंपन्या सांगत आहेत.

Advertisement

त्यामुळे येत्या काळात आणखी दरवाढ होण्याचे संकेत कंपन्यांनी दिले आहे. ‘एमएनजीएल’सह अन्य महानगरांतदेखील ‘सीएनजी’चे दर नुकतेच वाढवण्यात आले आहेत.

सीएनजी’चा प्रतिकिलोचा दर – ५९.५० रुपये

घरगुती वापराच्या गॅसचा (पीएनजी) प्रतिकिलोचा दर – २९.१० रुपये

Advertisement

पुण्यातील ‘सीएनजी’वरील वाहन संख्या – १,७०,०७८

पुणे मधील सीएनजी पंप – १०८

Advertisement