पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education) उदय सामंत (Uday Samant) यांनी शब्द (पब्लिसिटी) संस्थेच्या कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे (Narayan Rane) यांना टोला लगावला आहे.

तसेच माझा विधानसभेत (Assembly) निवडून येऊन दाखवा असे खुले आव्हान उदय सामंत यांनी नारायण राणे यांना केले आहे.

उदय सामंत म्हणाले की, जे टीका करतात ते आपल्या कर्मा ने मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही.

Advertisement

टीका करणाऱ्यां ना उत्तरही देत नाही. टीका करीत जे गाजावाजा करीत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. नाव न घेता सामंतांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा असे खुले आव्हान नारायण राणे यांना उदय सामंतांनी दिले आहे.

परवाच सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठास निधी देवू असे आश्वासन दिले होते. ४८ तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन केंद्रास ३ कोटी देण्याचा ठराव मंत्री मंडळात संमत करण्यात आला.

Advertisement

सत्कार दोन प्रकारचे असतात.एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे.

हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजेत. जांभेकर, टिळक यांनी पत्रकारितेचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Advertisement