Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आ. जगताप यांच्या प्रतिज्ञापत्रात तफावत

सासवडः आमदार, खासदारांच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली जाण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्या रांगेत आता आता पुरंदरचे आमदार चंद्रकांत जगताप यांचा समावेश झाला आहे. त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाची दिशाभूल

आमदार जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना २०१४ व २०१९ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात तपासणीअंती अनेक तफावती आढळून आल्या आहेत.

यात निवडणूक आयोगाची दिशाभूल व फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत असल्याने या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून याचिकाकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. अभिषेक सुभाष हरदास यांनी केली आहे.

पदवीही खोटी?

शेत जमीन, खरेदी-वारसा हक्काने मिळालेली जमीन, स्वतःची वाहने खरेदी, रहिवासी सदनिका, बंगला, इतर वापराच्या जमिनी व त्यांच्या किंमती, स्वतःचे आर्थिक उत्पन्न यातील तफावती व स्वतःची शैक्षणिक अर्हता सिद्ध करणारी प्रमाणित प्रमाणपत्रे यात मोठी तफावत

तपासाअंती आढळून आल्याने त्यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल होत असून ती फसवणूक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

जगताप यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये ‘एमबीए’ असल्याचा उल्लेख असून ‘एनआयबीएन’ या संस्थेत हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे नमूद केले आहे.

मात्र, संस्थेकडे माहिती घेतली असता, ‘एमबीए’ अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्धच नाही असे संस्थेने कळविले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Leave a comment