टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणावरून संशयाच्या भोव-यात सापडलेल्या संजय राठोड यांच्या मंत्रिपदी पुनरागमनाचे संकेत देण्यात आले होते; परंतु त्यांना पोलिसानी ‘क्लीन चिट’ दिलेली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या मंत्रिमंडळात येण्यातील गतिरोधक कायम आहेत, असे मानायला जागा आहे.

क्लोजर रिपोर्ट नाही

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

काही दिवसांपूर्वी उच्च शिक्षणणंत्री उदय सामंत यांनी राठोड यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाचे संकेत दिले.

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली असल्याच्या बातम्यांमुळे राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाऊ लागलं होते; परंतु पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही, असे वळसे पाटील यांनी सांगितल्याने राठोड यांचे पुनरागमन इतक्यात शक्य नाही.

आईवडीलांची तक्रार नाही

पूजा चव्हाण या तरुणीच्या आईवडीलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांत जबाब दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की आमची कोणाच्याही विरोधात तक्रार नाही आणि आमच्यावर कुणाचाही दबाव नाही.

पूजाच्या आईवडीलांनी दिलेल्या या जबाबानंतर पुणे पोलिसांनी राठोड यांना ‘क्लीन चिट’ दिली असल्यांचं वृत्त समोर आलं.

Advertisement

यामुळे राठोड यांना दिलासा मिळाला असून लवकरच मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशी चर्चा रंगली; पण वळसे पाटील यांनी पुण्यात प्रतिक्रिया देत राठोडांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकच्या चर्चांना ब्रेक लावला.

 

Advertisement