पुणे : कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ओमिक्रॉन (Omicron) या विषाणूचा (Virus) प्रसार हा अधिक प्रमाणात वाढत आहे. अशातच बारामतीमधून (Baramati) एक दिलासादायक बातमी येत आहे.

बारामती शहरात आणि तालुक्यात काल गुरूवारी कोरोना (corona) संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडला नाही. बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

कोरोनाचे बारामती तालुक्यात शहर आणि ग्रामीण मिळून ३२ रुग्ण उपचार घेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हीच रुग्णसंख्या अधिक होती तर आता डिसेंबर महिन्यात रुग्ण सापडण्याची संख्या ही शून्य झालेली आहे.

Advertisement

ही रुग्णसंख्या सापडण्याची संख्या शून्य झाली असली तरी ओमीक्रॉनने राज्यात डोके वर काढले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) विविध कार्यक्रमांमधून राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण (vaccination) करून घेण्याचे आव्हान करत आहेत.

बारामती शहर व तालुक्यात गुरुवारी २५३ जणांची तपासणी करण्यात आली होती. तपासणी करताना एकही संसर्ग झालेला रुग्ण आढळला नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली आहे.

आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे (Health Officer Dr. Manoj Khomane) म्हणाले, लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नये. गावोगोवी लस उपलब्ध करण्यात आली आहे.

Advertisement

ज्यांचा पहिला डोस राहिला असेल त्यांनी व ज्यांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा. गर्दीत जाणे टाळावे. मास्कचा (Mask) वापर करावा.